डॉ एस आर रंगनाथन
![]() |
पुस्तके मानवाचे चांगले मित्र असतात आणि ते जीवनाच्या शेवटपर्यंत साथ देतात. आजच्या युगात तर ग्रंथालयाचे महत्त्व फार वाढले आहे. सार्वजनिक ग्रंथालय, शैक्षणिक ग्रंथालय, व्यावसायिक ग्रंथालय अशा प्रकारे ग्रंथालय समाजात आढळतात. पारंपरिक ग्रंथालयापासून आजच्या ऑटोमेशन, यांत्रिकी, डिजिटल व व्हर्च्युअल ग्रंथालयापर्यंत विकास झालेला आहे. आजच्या वेळेला वाचकांची गरज ओळखून योग्य वेळेत ती सेवा पूर्ण करणे हेच ग्रंथालयाचे मुख्य ध्येय आहे. डॉ. एस. आर. रंगनाथन यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक मानले जाते. यांचा वाढदिवस देशात ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस’ म्हणून साजरा केला जातो. ग्रंथालयाचा प्रत्येक विभागावर डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी खूप बारकाईने काम करून अतुलनीय योगदान दिले आहे आणि डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी सांगितलेले ग्रंथालयशास्त्राचे पाच नियम (लॉ) ग्रंथालयात प्रत्यक्षात योग्यपणे उतरवणे हीच डॉ. एस. आर. रंगनाथन यांना सर्वोत्तम मानवंदना ही ठरेल.
Comments
Post a Comment